राज्य शासनाचे वाईन धोरण म्हणजे ढवळ्याशेजारी बांधला पवळा – हभप बंडातात्या कराडकर यांचा साताऱ्यात आरोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०४ फेब्रुवारी २०२२ । सातारा । वारकरी संप्रदाय चे प्रमुख मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांनी सातार्‍यात राज्य सरकारवर वेगवेगळ्या आरोपांची राळ उडवून दिली . शासनाचे वाईन धोरण म्हणजे ढवळ्याशेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला असे आहे यातला ढवळा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि त्यांना ज्याला गुण लागला ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा वाईन धोरणाचा वारकरी संप्रदाय समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही अशी सणसणीत टीका बंडातात्या यांनी साताऱ्यात केली

तसेच बड्या बड्या मंत्र्यांची मुले सर्रास दारू पितात अगदी सुप्रिया सुळे सुद्धा याला अपवाद नाहीत असा आरोप बंडातात्या यांनी जाहीरपणे करून एकच खळबळ उडवून दिली .व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांचे साताऱ्यात दंडुका दंडवत आंदोलन झाले या आंदोलनादरम्यान मार्गदर्शनानंतर बंडा तात्या कराडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यामध्ये त्यांचे आक्रमक स्वरूप दिसून आले

बंडातात्या म्हणाले शासनाच्या डोळ्यावरील ही मद्य धुंदी उतरवण्यासाठी वारकरी संप्रदाय वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सातत्याने करतच राहील .याची गंभीर दखल राज्य शासनाने घ्यावी दारू विक्रीतून इतके नुकसान होत असेल होणार असेल तर याची जबाबदारी राज्य सरकारवर नाही काय ? वाईन विक्री चे धोरणात्मक निर्णय हे अजित दादा पवार यांचे आहेत ते म्हणजे ढवळा असून त्यांच्या जोडीने काम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पवळा आहेत निर्णय अजितदादांनी घ्यायचा आणि तो मुख्यमंत्र्यांनी राबवायचा हे आज पर्यंतचे महा विकास आघाडीचे धोरण आहे मात्र आम्ही महाराष्ट्र राज्य मद्याच्या आहारी जाऊ देणार नाही भल्याभल्या मंत्र्यांची पोर सर्रास दारू पितात अशी किती उदाहरणे देता येतील कराडात आमदार बाळासाहेब पाटील यांचेही चिरंजीव दारू पितात हे साऱ्या दुनियेला माहित आहे दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव अभिजित कदम यांच्या अपघाताचा दाखला देऊन बंडातात्या म्हणाले हा अपघात कसा घडला आणि का घडला याची चौकशी केली तर सत्य समोर येईल हेही जगजाहीर आहे खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा राजकारणात येण्यापूर्वी दारू पीत होत्या आणि याचे ढीगभर पुरावे द्यायला मी तयार आहे . पत्रकारांना या सार्‍या गोष्टींची जाणीव आहे तरीही तुम्ही तिरकस प्रश्न विचारून मनाजोगते उत्तर काढून घेण्याचा प्रयत्न करतात असे खळबळजनक वक्तव्य बंडातात्या यांनी करून जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे


Back to top button
Don`t copy text!