गोडोली तलावाच्या सुशोभीकरणाला राज्य शासनाचा हिरवा कंदील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा शहराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या गोडोली गावठाणातील गोडोली तलावाच्या सुशोभीकरणाला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे येथे विविध सुविधा आणि तळ्याचे अद्ययावतीकरण या कामांकरिता केंद्र आणि राज्य यांच्या अमृत दोन या योजनेअंतर्गत चार कोटी 83 लाख रुपयांच्या कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रका द्वारे दिली आहे.

जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमृत दोन या योजनेअंतर्गत गोडोली तलावाला नवीन स्वरूप देण्याकरिता राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने विविध सोयी सुविधा देण्याकरता 4 कोटी 83 लाख रुपयांच्या प्रशासकीय कामांना मंजुरी दिली आहे . या योजनेमध्ये केंद्र शासनाचा निधीचा वाटा एक कोटी 61 लाख राज्य शासनाचा निधीचा वाटा दोन कोटी 50 लाख तर सातारा नगरपालिकेचा निधीचा वाटा तब्बल 72 लाख रुपये आहे या कामाचा दोन कोटी रुपयांचा लवकरच सातारा पालिकेला प्राप्त होणार असून येत्या 45 दिवसात या कामाची निविदा प्रसिद्ध करून तातडीने या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

तळे सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये गोडोली तलावाच्या बाजूने कंपाउंड वॉल, गोल बैठक व्यवस्था, फ्लावर बेड, गार्डन पॅसेज, लँडस्केप पिचिंग,खेळणी आणि ट्रॅक याकरिता एक कोटी 29 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत यानंतर सरोवर सजावट रिटेनिंग त्याचबरोबर फ्लोअर पिचिंग या कामांसाठी एक कोटी 53 लाख रुपये खर्च येणार आहे व गोडोली तळ्यातील पाण्याची स्वच्छता आणि कारंजे या कामासाठी एक कोटी अकरा लाख रुपये खर्च येणार आहे उर्वरित रक्कम ही जीएसटी आणि अन्य प्रशासकीय कामासाठी खर्च होणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

गोडोली तळ्याचे सौंदर्य वाढल्यास सातारा शहरात येणाऱ्या नागरिकांना गोडोली तळे एक पर्यटन केंद्र म्हणून निश्चित आकर्षणाचा विषय राहील आणि या निधीच्या माध्यमातून सातारकरांना चांगल्या सुविधा देऊ शकतो याचे आम्हाला अतिव समाधान असल्याची भावोत्कट प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी पत्रकात व्यक्त केली आहे.


Back to top button
Don`t copy text!