
दैनिक स्थैर्य । 23 जून 2025 । फलटण । येथील श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील बॉक्सर अभिराज मारुती तरडे याला वुशू खेळातील राज्य सरकारची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
बॉक्सर पैलवान अभिराज मारुती तरडे याने महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या कुस्तीच्या वुशू प्रकाराच्या खेळात तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर सुवर्णपदक प्राप्त केले होते. तसेच राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल राज्य सरकारने त्यास शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.
यशाबद्दल त्याचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सचिव समशेरसिंह नाईक निंबाळकर, संचालक अजित गायकवाड, प्राचार्य रणदेव खराडे, प्राचार्य सुनील सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक अनुप शहा, नगरसेवक अजय माळवे, शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष फिरोज आतार, तानाजी कदम, निखिल उपाध्याय, दशरथ लोखंडे, प्रा. सतीश जंगम, प्रा. रवींद्र कोकरे, सचिन मोरे आदींनी अभिनंदन केले.

