राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा येथील भरारी पथकाचे छापे; १ लाख ४५ हजार ४० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२७: राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा येथील भरारी पथकाने दि. २५ रोजी पुसेगाव, ता. खटाव व सोकासन, ता. माण येथे छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ४० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

यांबाबत माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्व अबकारी अनुज्ञप्ती दि. २४ पासून सायंकाळी ५ पासून बंद केल्या आहेत. या कालावधीमध्ये मद्याची बेकायदेशीर निर्मिती, वाहतूक व विक्री वाहतूक यावर आळा घालण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क , साताराचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेव्दारे उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने दिनांक २५ रोजी जिल्हयातील पुसेगांव, ता. खटाव व सोकासन ता. माण येथे बेकायदेशीर देशी , विदेशी , बिअर मद्यसाठयावर छापे घातले. पुसेगांव येथून नसरुददीन अमानुल्ला मुल्ला वय २९ आणि सोकासन येथून अनिल शिवाजी बोडरे वय ३० वर्षे, अविनाश जगन्नाथ भोसले वय ३० वर्षे व एका अज्ञात इसम यांच्या ताब्यातून एकूण देशी दारुचे ३७ बॉक्स , विदेशी दारुचे एकूण ६ बॉक्स व बिअरचे २ बॉक्स असा एकूण १ लाख ४५ हजार ४० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. याप्रकरणी एकूण चारजणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सदर कारवाईमध्ये निरीक्षक आर. एल. पुजारी , दुय्यम निरीक्षक नंदु क्षीरसागर , नितीन जाधव , महेश मोहिते , संतोष निकम , अजित रसाळ , जीवन शिर्के , सचिन खाडे , किरण जंगम यांनी भाग घेतला. तपास निरीक्षक आर. एल. पुजारी करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!