विदेशी मद्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०६ जानेवारी २०२२ । मुंबई । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज वरळी-मुंबई या ठिकाणी विदेशी मद्याविरोधात कारवाई करून आरोपीस अटक केली. या प्रकरणात विदेशी मद्य पुरवणाऱ्या मुख्य सूत्रधारास अटक करण्यात आली असून फरारी आरोपींचा तपास सुरू आहे.

या गुन्ह्यात विदेशी मद्य (स्कॉच), एक मोबाईल, स्मार्ट वॉच, एक बॅग, एक दुचाकी सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट असे एकूण ४ लाख ६२ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात शेहजाद हसनेन कुरेशी आणि मोहम्मद दानिश मुश्ताक अहमद खान या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, मुंबई आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क, ठाणेचे विभागीय उप-आयुक्त, सुनिल चव्हाण, अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा तसेच मुंबई शहर अधीक्षक सी.बी. राजपूत, उप अधीक्षक श्री.पोकळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गी कारवाई निरीक्षक प्रसाद सास्तुरकर, निरीक्षक ओ.एच.घरत, निरीक्षक, दुय्यम निरीक्षक डी.बी.भदरगे, दुय्यम निरीक्षक आर. जी. जाधव, जवान सर्वश्री. शेलार, मोरे, कुंभार, तडवी, यांनी यशस्वीरित्या पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक डी. बी. भदरगे हे करीत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. 1, मुंबई यांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!