क व ड प्रवर्गातील पात्र सहकारी संस्थांची प्रारूप मतदार यादी अंतीम करण्यास सोमवारपासून प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील क प्रवर्ग व ड प्रवर्गातील निवडणुकीस पात्र सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी अंतीम करण्याचा कार्यक्रम दि. 20 पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तालुका सहकारी निवडणुक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण सुनील धायगुडे यांनी दिली आहे.

फलटण तालुक्यातील प्रवर्ग ड सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार यादी अंतीम करणेचा कार्यक्रम दिनांक 20/9/2021 पासून सुरू करण्यात येत असून ड प्रवर्गातील 1) फलटण शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्या फलटण ता.फलटण, 2) दि.फलटण तालुका कॉटन सेल जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग को – ऑपरेटिव्ह सोसायटी लि.फलटण, 3) रणजितदादा नाईक निंबाळकर वाहतुक सहकारी संस्था मर्या फलटण ता.फलटण, 4) श्रीमंत रामराजे मोटार वाहतुक सहकारी संस्था मर्या फलटण ता.फलटण,5) फलटण तालुका सहकारी द्राक्ष बागायतदार संघ मर्या फलटण ता.फलटण, 6) गिरवी द्राक्ष उत्पादक सहकारी संस्था मर्या गिरवी ता.फलटण, 7) श्री.काळेश्वर कॉटन सेल जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग को – ऑप सोसायटी लि.आसू ता.फलटण, 8) फलटण तालुका कांदा उत्पादक सहकारी खरेदी विक्री संघ मर्या फलटण ता.फलटण, 9) वाजेगाव सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या वाजेगाव ता.फलटण जि.सातारा,10) सरडे सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या सरडे ता.फलटण जि.सातारा, 11) श्री.जोतिबा मजुर सहकारी संस्था मर्या वडगाव ता.फलटण ता.फलटण जि.सातारा, 12) दलित वर्ग मजुर सहकारी संस्था मर्या फलटण ता.फलटण जि.सातारा, 13) ज्योतीलींग मजुर सहकारी संस्था मर्या पिंपळवाडी ता.फलटण जि.सातारा, 14) श्री.शंभुमहादेव मजुर सहकारी संस्था मर्या पिंपळवाडी ता.फलटण जि.सातारा, 15) विश्व मजुर सहकारी संस्था मर्या साखरवाडी ता.फलटण जि.सातारा, 16) सिध्दटेक मजुर सहकारी संस्था मर्या फलटण ता.फलटण जि.सातारा, 17) काळेश्वर मजुर सहकारी संस्था मर्या आसु ता.फलटण जि.सातारा, 18) श्री.साई मजुर सहकारी संस्था मर्या सुरवडी ता.फलटण जि.सातारा, 19) मातोश्री मजुर सहकारी संस्था मर्या भाडळी बु॥ ता.फलटण जि.सातारा, 20) साई मजुर सहकारी संस्था मर्या फलटण ता.फलटण जि.सातारा, 21) राज रोजगार स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्या तिरकवाडी ता.फलटण जि.सातारा, 22) स्वराज सहकारी स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्या कोळकी ता.फलटण जि.सातारा, 23) कृषीरत्न श्री.बी.के.भाऊ निंबाळकर कृषी व पुरकसेवा सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या विंचुर्णी ता.फलटण जि.सातारा या संस्थांच्या मतदार यादी सविस्तर कार्यक्रम व प्रारूप मतदार यादी त्या त्या संस्थेच्या नोटीस बोर्ड व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था.फलटण कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत . त्या त्या संस्थांच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती स्वीकारण्याचा अंतीम दिनांक 27/9/2021 हा आहे. त्यानंतर अंतीम मतदार यादी प्रसिध्द होवून निवडणुक प्रक्रिया पूर्ण होणार आहे, अशी माहिती तालुका सहकारी निवडणुक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण सुनील धायगुडे यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!