दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२१ । फलटण । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एस.टी. बस सेवा बंद केल्या होत्या. आता दिनांक 4 ऑक्टोबर पासून 5 वी ते 10 वी च्या शाळा सुरु झाल्या आहेत. फलटण पूर्व भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी फलटणला येत असतात. त्यामुळे त्यांना ये – जा करण्यासाठी फलटण पूर्व भागातील एस.टी.बस सेवा पूर्ववत सुरु कराव्यात, अशी मागणी शंभू सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष निखिल निंबाळकर यांनी फलटण आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सद्यस्थितीत शाळा सुरु होऊनसुद्धा एस.टी.अभावी अनेक विद्यार्थ्यांना फलटणला शाळेत जाण्यायेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसा नहोत असून याची दखल घेवून 1) फलटण – राजाळे – आसू, 2) फलटण – निंबळक – गुणवरे व 3) फलटण – सरडे एस.टी.बसेस सुरु कराव्यात. अन्यथा यासाठी जनआंदोलन उभारले जाईल, असेही निंबाळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.