दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । मुंबई ।सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात चालविल्या जाणाऱ्या दिव्यांग शाळा व कार्यशाळा एक मार्चपासून शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून सुरू करण्यात याव्यात असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त तसेच अन्य जिल्हा स्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा परिषद प्रशासनाशी समन्वय साधून शालेय शिक्षण विभागाच्या दि. 20 जानेवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग शाळा सुरू करण्याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा व कार्यशाळा चालवल्या जातात. या शाळांची देशात सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे कोविड संसर्गाच्या काळात या शाळा बंद होत्या, आता एक मार्चपासून या शाळा कोविड विषयक नियमांचे पूर्णपणे पालन करून सुरू करण्यात येत आहेत अशी माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी दिली आहे.