सोलापूर-मुंबई-दिल्ली थेट विमानसेवा सुरू करा; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी


स्थैर्य, फलटण, दि. १३ ऑगस्ट : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोलापूर-मुंबई-दिल्ली अशी थेट विमानसेवा सुरू करण्याची प्रमुख मागणी केली.

या विमानसेवेमुळे सोलापूर आणि परिसरातील नागरिकांचा प्रवास सुलभ होईल, तसेच व्यापार आणि व्यवसायाला चालना मिळेल, असे मोहिते-पाटील यांनी सांगितले. यासोबतच, तातडीच्या शासकीय कामांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विमान प्रवासाची परवानगी आणि सवलत देण्याची मागणीही त्यांनी केली, ज्यामुळे कामकाजात गती येईल, असे ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीवेळी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे आणि हिंदकेसरी पै. योगेश दोडके हे देखील उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!