शाळा सुरू करा : ऑनलाइन शिक्षणाची काहीच गरज नाही, उन्हाळाच्या सुट्ट्या रद्द करुन जानेवारी 2021 पासून शाळा सुरू करा- बच्चू कडू यांचा प्रस्ताव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१७: कोरोनामुळे अद्याप शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आलेली नाहीत. यातच जानेवारी महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात यावे, अशी अनेकांनी मागणी केली आहे. अशीच मागणी राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनीदेखील केील आहे. ‘जानेवारी महिन्यापासून शाळा सुरू कराव्यात आणि उन्हाळ्याची सुट्टी रद्द करावी,’ असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्याचे बच्चू कडू म्हणाले.

माध्यमांशी बोलतना बच्चू कडू म्हणाले की, ‘कोरोनामुळे अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे, परंतू त्याची गरज नाही. यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता आहे. शिक्षण हे सार्वत्रिक असायला हवे, सर्वांना समान मिळाले पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यातून विषमता निर्माण होऊ नये. या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, यांच्यासोबत अनेकदा व्हीसीद्वारे बैठका झाल्या आहेत. यासाठी धोरण निश्चित झाले पाहिजे. सर्वांना 100 टक्के शिक्षण मिळावे यासाठी उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात याव्या, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे’, असे बच्चू कडू यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!