नाशिक पुणे मार्गे मंडणगड कायमस्वरुपी एसटी बससेवा सुरु करा – राष्ट्रीय सरचिटणीस श्री. वैभव बहुतूले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२३ । नाशिक । नाशिक पुणे मार्गे मंडणगड एसटी बससेवा कायमस्वरुपी मंजूर करून सुरु करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री वैभव बहुतूले,संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांनी प्रादेशिक महाव्यवस्थापक (वाहतूक) श्री शिवाजी जगताप यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड हे महत्वाचे ठिकाण असुन लवकर विकसीत होणारा तालुका आहे मंडणगड  येथे नाशिक व अन्य परिसरातील अनेक नागरिक शिक्षण,निम शासकीय व शासकीय नोकरी,व्यवसाय,उद्योग-धंद्यानिमित्त नाशिक,पुणे,मंचर,नारायणगाव,भोसरी,सिन्नर,आळेफाटा,मंडणगड येथे कार्यरत आहेत मंडणगड येथील नागरिकांना नाशिक,सिन्नर,आळेफाटा,नारायणगाव,मंचर,भोसरी,पुणे येथे येण्या-जाण्यासाठी पुरेशी बससेवा नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे.
नाशिक पुणे मंडणगड बससेवा कायमस्वरुपी सुरु ठेवण्यात आल्यास ओझर येथील विघ्नहर गणपती येथे जाण्यासाठी मोठी सोई सुविधा उपलब्ध होणार आहे तसेच एसटी महामंडळाच्या उत्पन्न-प्रवासी संख्येत वाढ होईल अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री वैभव बहुतूले,संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांनी प्रादेशिक महाव्यवस्थापक मा.श्री शिवाजी जगताप पर्यटनवृद्धी संदर्भात बोलताना सांगितले आहे.

Back to top button
Don`t copy text!