दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन पोलिस सहायक निरीक्षक कदम यांना नुकतेच देण्यात आले आहे.
निवेदनात फलटण शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करण्याची मागणी यांचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या संदर्भात पोलिसांनी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरात लोकसहभागातून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत ते त्वरित सुरु करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष पंकज पवार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रितम जगदाळे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अल्ताफ पठाण, ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष विकास ननावरे, शहर कार्यकारिणी सदस्य मनोहर गायकवाड उपस्थित होते.