४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
दैनिक स्थैर्य | दि. 05 ऑगस्ट 2024 | फलटण | येथे पूर्वी जनावरांचा बाजार सुरू होता. तो आता बंद झालेला आहे तरी फलटणमध्ये जनावरांचा बाजार सुरू करावा!; अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात बेडके म्हणतात की; फलटण येथे जनावरांचा बाजार सुरू करताना तो चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध देऊन पुन्हा एकदा सुरु करण्यात यावा, जनावरांच्या आठवडा बाजारामुळे तालुक्यातील शेतकरी व्यापारी व पशुपालकांची चांगली सोय होईल, तसेच मार्केट कमिटीमधील बंद असलेले गाळे पुन्हा निविदा काढून व्यवसायिकांना उपलब्ध करुन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी.
जे गाळाधारक आहेत, त्यांनी पोटभाडेकरु ठेवून त्याचा गोडाऊन साठी वापर केला जात आहे; तसे न करता व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करुन द्यावेत, जेणेकरुन फलटणचा व्यापार वाढण्यास मदत होईल; असेही बेडके यांनी निवेदनात म्हटले आहे.