स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्टबरोबर भागीदारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.१३: स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट लोजीस्टिक्स आणि इमर्जन्सी मेडिकल रिस्पॉन्स कंपनीने ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. ग्रिप इन्व्हेस्ट एक असा मंच आहे, जो कॉर्पोरेट्सना लीझवर दिलेल्या प्रत्यक्ष मालमत्तेत गुंतवणूक करण्याची संधी प्रदान करतो. या भागीदारीत स्टॅनप्लस देशभरात आपले रेड ऍम्ब्युलन्स नेटवर्क वाढवण्यासाठी ग्रिप इन्व्हेस्टकडून ऍम्ब्युलन्स लीझवर घेईल.

या भागीदारीतील विशेष गोष्ट ही आहे की, ग्रिप इन्व्हेस्ट एचएनआयसारख्या लोकांना आपल्या लीझिंग मॉडेलमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा देते, ज्याची सुरुवात रु. ५० हजारपासून होते. ज्यामुळे त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलियोमध्ये वैविध्य येते, १७% आयआरआर कमावता येतो आणि सध्याच्या खडतर काळात देशाच्या ऍम्ब्युलन्स नेटवर्क निर्मितीत हातभारही लावता येतो. स्टॅनप्लस १० रेड ऍम्ब्युलन्ससह भागीदारीची सुरुवात करून अखेरीस ही संख्या ३० शहरांमध्ये १०० पर्यंत वाढवेल.

स्टॅनप्लसचे संस्थापक आणि सीईओ श्री. प्रभदीप सिंह म्हणाले, “याआधी ब-याच लोकांनी आम्हाला अशी पृच्छा केली होती की, भारतात मेडिकल ट्रान्सपोर्टेशन सेवा सुधारण्यासाठीच्या आमच्या प्रयत्नांत ते कशा प्रकारे हातभार लावू शकतील. ग्रिप इन्व्हेस्टने त्यांना आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवत हे करण्याची उत्तम संधी दिली आहे. आम्ही भारतीय मार्गांवर अधिक ऍम्ब्युलन्स उतरवण्यास सक्षम होत असतानाच ग्रिपच्या गुंतवणूकदारांना १७% मासिक रिटर्न देखील देऊ. मला वाटते की, ही काळाची गरज आहे आणि या आवश्यक सहयोगाबद्दल मी ग्रिप इन्व्हेस्टचा आभारी आहे.”

स्टॅनप्लस १० ऍम्ब्युलन्ससाठी रु. २.५ कोटींची गुंतवणूक करेल आणि ती वाढत वाढत १०० साठी रु. २८ कोटींपर्यंत पोहोचेल. कंपनीचे ध्येय २०२१ मध्ये तिप्पट वाढ करण्याचे आहे, ज्यासाठी त्यांना लक्षित भौगोलिक क्षेत्रात ऍम्ब्युलन्सचे नेटवर्क सक्षम करणे गरजेचे आहे. ग्रिप इन्व्हेस्टबरोबर केलेल्या भागीदारीमुळे कंपनीच्या विकासाला वेग येईल आणि त्याचबरोबर देशाची सेवा करण्याची त्यांची क्षमता देखील वृद्धिंगत होईल.


Back to top button
Don`t copy text!