
दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । मुंबई । स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने आज भारतातील दुस-या क्रमांकाचा सगळ्यात मोठा ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म इझमायट्रिपसोबतच्या आपल्या को-ब्रॅण्डेड क्रेडिट कार्डच्या आगमनाची घोषणा केली. ‘इझ माय ट्रिप स्टँडर्ड चार्टर्ड क्रेडिट कार्ड’ आपल्या कार्डमेंबर्सना प्रवासावरील खास सुविधा, झटपट सवलती आणि रिवॉर्ड पॉइंट्स देऊ करणार असल्याने हे क्रेडिट कार्ड सर्वाधिक बक्षिसे मिळवून देणारे ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड ठरणार आहे.
हे क्रेडिट कार्ड डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हॉटेल बुकिंग्जवर २० टक्के झटपट सूट तर इझमायट्रिपच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्लिकेशनवरून केलेल्या डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाइट्सच्या बुकिंग्जवर १० टक्के झटपट सूट मिळवून देईल. याशिवाय कार्डमेंबर्सना स्वतंत्र एअरलाइन्स आणि हॉटेल वेससाइट्स/अॅप्सवरून केलेल्या फ्लाइट, हॉटेल बुकिंग्जवरही वेगाने रिवॉर्ड पॉइंट्स मिळवता येतील. मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट्स स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या रिवॉर्ड कॅटलॉगमधील इझमायट्रिपसह इतर अनेक ब्रॅण्ड्सवर खर्च करता येतील.
या कार्डचा एक मुख्य फायदा म्हणजे कार्डमेंबर्सना इझमायट्रिपच्या वेबसाइट/मोबाइल अॅप्लिकेशनवरून केलेल्या फ्लाइट्स आणि हॉटेल्स बुकिंग्जवर वर्षभर झटपट सवलतीचा लाभ मिळत राहील. याशिवाय कार्डमेंबर्सना कॅलेंडर वर्षातील प्रत्येक तिमाहीमध्ये एकदा डोमेस्टिक लाउंजमध्ये आणि वर्षाकाठी दोन आंतरराष्ट्रीय लाउंजमध्ये प्रवेश मिळेल. इतकेच नव्हे तर कार्डमेंबर्सना इझमायट्रिप वेबसाइट/मोबाइल अॅप्लिशकेशनवर विशिष्ट कालावधीदरम्यान मिळणा-या प्रमोशनल ऑफर्स आणि सवलतींचा आनंदही लुटता येईल.
इझमायट्रिपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले, “इझमायट्रिपच्या माध्यमातून अशी एक पर्यटन परिसंस्था उभारण्यावर आमचा भर आहे, जिथे सर्व लाभ हे सदैव ग्राहकांनाच प्राप्त होतील. हे करत असताना आमच्या ग्राहकांना ज्यात रस वाटेल अशा पार्टनरशिप्सचा शोध घेण्यावर आणि त्यांना अनेक प्रकारच्या प्रमोशनल ऑफर्सकडे आकर्षित करून त्यांना आमच्यासोबत अनुभवात्मक प्रवासाची संधी देण्यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रित केले आहे. हे को-ब्रॅण्डेड क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेशी केलेल्या पार्टनरशिपचा आम्हाला आनंद आहे आणि हे कार्ड ग्राहकांच्या आवडीची अॅक्सेसरी ठरेल याची आम्हाला खात्री आहे.”
स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या क्रेडिट कार्ड्स आणि अनसिक्युअर्ड लेंडिंग, इंडिया विभागाचे प्रमुख विनय मिस्रा म्हणाले, “इझमायट्रिपबरोबर केलेल्या सहयोगाबद्दल आणि कार्डमेंबर्सना विशेष सोयी-सवलतींचा गुच्छ देऊ करणा-या या को-ब्रॅण्डेड क्रेडिट कार्डच्या शुभारंभाबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत. प्रवास आणि आतिथ्य क्षेत्राला असलेल्या मागणीमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रवास सुरू करण्याची इच्छा असणा-या आणि त्यावर सूटही मिळवू पाहणा-या ग्राहकांसाठी हे क्रेडिट कार्ड अत्यंत योग्य वेळी दाखल झाले आहे असे मला ठामपणे वाटते.”