एसटी कामगार संघटनेचे नेते विलास जाधव यांचे निधन


स्थैर्य, सांतारा, दि.२३: एसटी कामगार संघटनेचे सक्रिय असलेले नेते व एसटी कामगार को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक, सेवानिवृत्त एसटी कर्मचारी विलास जाधव (७९) यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले.

१९७६ साली आणिबाणीच्या कालखंडात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली होत असताना व्ही. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथे एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी अधिवेशन त्यांनी घेतले होते. त्याच बरोबर साताऱ्यातील प्रख्यात वकील व माजी आमदार स्मृतीशेष व्ही. एन. पाटील यांचे स्मारक सातारा येथे व्हावे यासाठी राज्य शासनाकडून जागाही मिळवून व्ही. एन पाटील स्मारक समितीचे प्रमुख पदाधिकारी म्हणून ते काम पाहत होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

सेवानिवृत्तीनंतर ते पुणे येथे श्रमीक महिला मोर्चा या संघटनेत ते सक्रिय काम करत होते.


Back to top button
Don`t copy text!