
दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२१ | फलटण | वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व एस. टी. महामंडळाच्या कामगारांनी पुकारलेल्या संपला आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्याबाबतचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना दिले.
यावेळी राहुल कांबळे, सौ. चित्र गायकवाड, विकास निकाळजे, सपना भोसले, उमेश कांबळे, विजय कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळामध्ये जर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ एस. टी. महामंडळाच्या कामगारांवर आली तर वंचित बहुजन आघाडी सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा सुद्धा यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी दिला.