स्थैर्य, कराड, दि.१७: कराड रस्त्यावर सुर्ली घाटात काल दुपारनंतर वांग रेठरे-कऱ्हाड ही कऱ्हाड आगाराची एसटीबस उलटली. या अपघातात एसटी चालकासह पाच प्रवाशी किरकोळ जखमी झाले. एसटीबस डोंगराकडील बाजूला पलटी झाल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर बराचकाळ त्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तद्नंतर पोलिसांनी ती पूर्ववत केली.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
घटनास्थळावरुन व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कऱ्हाड-विटा रस्त्याचे काम सुरु आहे. त्यातच सध्याच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे घाटातील खड्डे चुकविण्याच्या नादात काहीवेळा अपघात होत आहेत. कऱ्हाड आगाराची वांग रेठरे-कऱ्हाड ही कऱ्हाड आगाराची एसटीबस येत होती. ती सुर्ली घाटात आल्यावर एका वळणावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचा एसटीवरील ताबा सुटला. त्यामुळे एसटीबस डोंगराकडील बाजूला पलटी झाली.
या अपघातात एसटीतील पाच जण जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, एसटी दुसऱ्या बाजूला पलटी झाली असती, तर दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली असती. परंतु सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने एसटी रस्त्यावरून बाजूला करत विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही पोलिस ठाण्यात सुरू होती.