
दैनिक स्थैर्य | दि. 20 फेब्रुवारी 2025 | फलटण | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे दि. २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ पर्यंत आयोजित केलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भात यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथील परीक्षा केंद्र क्रमांक 1002 ची बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
दहावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरू होणार असून, यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे परीक्षा क्रमांक F025108 ते F025526, F400013 असलेल्या एकूण 428 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे रिसीट, ओळखपत्र लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळेपूर्वी 30 मिनिट अगोदर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमणध्वनी, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, स्मार्टवॉच, पॉकेट, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक साधने तसेच बोर्डाने बंदी घातलेली साधने बाळगण्यास सक्त मनाई आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त व निर्भय वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन केंद्र संचालक सौ. सुरवसे व्ही के, उपकेंद्र संचालक सौ. भागवत एस एम, उपकेंद्र संचालक अजय वाघमारे सर, प्राचार्य थोरात एस बी, उपप्राचार्य घनवट पी डी यांनी केले आहे.
परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे, यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन देण्यासाठी तयार असतील, याची खात्री दिली आहे.
दहावी बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाची टप्पा असल्याने, यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथील परीक्षा केंद्राची व्यवस्था अत्यंत काटेकोरपणे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निर्धारित नियमांचे पालन करून परीक्षा देण्यासाठी तयार राहावे, याची अपेक्षा आहे.