दैनिक स्थैर्य । दि. २१ नोव्हेंबर २०२२ । बारामती । सेव इंडिया असोशियन पुणे यांच्यावतीने येथील पंडित जवाहरलाल नेहरू भवन पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्काराने विविध क्षेत्रातील पुरस्कार्थींबरोबर कलाक्षेत्रातील चित्रकला,रांगोळी,नाट्य,पोवाडा,पथनाट्य, भारुड व सुत्रसंचालन,विद्यार्थांसाठी राबवलेले कलात्मक विविध उपक्रम, या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल आदर्श कलाशिक्षक म्हणुन कलारत्न पुरस्काराने सेव इंडिया असोसिएशनच्या अध्यक्षा सौ.श्रद्धाताई भोर ,कार्यक्रमाचे पाहुणे श्री.संतोष गवळी साहेब (जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक,),मा.श्रीकृष्ण सावंत (व्यवसायिक मार्गदर्शक), मा.शिल्पा ब्राह्मणे (व्यवस्थापिका, सेंट्रल गव्हर्मेंट प्रोजेक्ट) यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह,मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.हा आदर्श कलाशिक्षक म्हणुन मिळालेला बहुमान अनमोल असुन आतापर्यंत कलेच्या कार्याची पावती आहे.हा पुरस्कार भविष्यातील कलेच्या कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सागर आटोळे सर, संचालक,मुख्याध्यापक शिंदे सर,सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष अभिनंदन व कौतुक केले.