
स्थैर्य, सातारा, दि. 23 ऑक्टोबर – शाहूपुरी भागातील अंजली कॉलनीतील रहिवासी श्रीनिवास व्यंकटेश देशपांडे (वय 95) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, चार विवाहित मुली, जावई, तीन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये शाखा अधिकारी या पदावर त्यांनी काम करून सेवानिवृत्त झाले होते. नोकरीच्या कालावधीत ते मुलुंड, गोरेगाव- माणगाव, टेंभुर्णी, बार्शी, आष्टा, पहुर, सातारा या युनायटेड वेस्टर्न बँकेच्या शाखातून त्यांनी शाखा व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. मूळचे कर्नाटकातील जमखंडी येथील ते होते. राष्ट्र सेवा दलाशी ते विद्यार्थी दशेत असताना संबंधित होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक सदस्यांपैकी एक सदस्य होते. ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांचे ते सासरे होते.

