श्रीमंत रामराजे विधानपरिषदेचे सभापती ?


दैनिक स्थैर्य | दि. 2 जुलै 2023 | मुंबई | सातारा जिल्ह्याचे जेष्ठ नेते, विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आज उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असल्याने विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा विधानपरिषदेचे सभापती होणार असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे; अश्या विविध चर्चा सध्या सातारा जिल्ह्यासह राज्यामध्ये सुरु आहे.

विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन हे येत्या दि. १७ जुलै पासून मुंबई येथील विधान भवन येथे संपन्न होणार असून त्याचवेळी सध्या रिक्त असलेल्या सभापती पदावर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचीच वर्णी लागेल; असा अंदाज वर्तवला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!