दैनिक स्थैर्य | दि. ३० डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण आयोजित ‘श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५’चा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न होणार आहे. हे कृषी प्रदर्शन श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, जिती नाका, फलटण येथे आयोजित केले असून हे प्रदर्शन सोमवार, दि. ८ जानेवारी २०२५ पर्यंत चालणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. प्रशांतकुमार पाटील (कुलगुरु, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी) यांच्या हस्ते होणार असून विधान परिषदेचे माजी सभापती व फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, महाविद्यालयीन समितीचे व्हाईस चेअरमन श्री. शरदराव रणवरे, फलटन एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कृषी प्रदर्शनाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कृषी प्रदर्शन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.