सृजन बिचुकलेची ‘विजय मर्चंट ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील श्रीमंत रामराजे क्रिकेट क्लबचा खेळाडू सृजन बिचुकले याची सूरत (गुजरात) येथे होणार्‍या अंडर – १६ विजय मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य आमंत्रित क्रिकेट स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याचे कर्णधारपद भूषवत सृजन बिचुकले याने फलंदाजीमध्ये ४५० रन्स बनवल्या, ज्यात १ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश होता आणि गोलंदाजीमध्ये १९ विकेटस् मिळवत सृजनने कर्णधारपदाला साजेशी कमिगिरी केली व या उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली.

सृजनला श्री. मिलिंद सहस्त्रबुद्धे सर श्री. सोमनाथ चौधरी सर, श्री. मिलिंद (टिल्लू) चौधरी सर, श्री. संदेश साळुंखे यांचे मार्गदर्शन तसेच श्री. सदानंद प्रधान सर यांचे आशिर्वाद लाभले. तसेच सृजनचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

श्रीमंत रामराजे क्रिकेट क्लबचे सलग २ वर्षे २ खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मागच्या वर्षी याच स्पर्धेत यशराज मदने याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.


Back to top button
Don`t copy text!