
दैनिक स्थैर्य | दि. ६ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट या धर्मादाय संस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी पादुका परिक्रमा प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही आयोजित केली आहे. ही पालखी पादुका परिक्रमा दि. २५ नोव्हेंबर २०२३ ते १२ जून २०२४ अखेर संपन्न होत आहे. ही पालखी पादुका परिक्रमा सोमवार, दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता फलटण शहरात येत असून या पालखी पादुकांसोबत २५ ते ३० सेवेकरी आहेत.
फलटण शहरात श्री. संजय यशवंत चोरमले (रा. बुधवार पेठ, फलटण) यांच्याकडे या स्वामी समर्थ पादुका परिक्रमा सोहळ्याचे नियोजन आहे.
कोणत्याही कारणामुळे श्री स्वामींच्या दर्शनास अक्कलकोट येथे येऊन श्रींची सेवा करता येत नाही अशा माता-भगिनी व अबालवृध्दांना व स्वामीभक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रासादिक पादुकांच्या दर्शनाचा लाभ व्हावा आणि श्री स्वामींच्या सेवेची संधी लाभावी, या उद्देशाने ही स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा आयोजित केली आहे.
पालखी पादुकांसोबतचा संपर्क क्रमांक मोबा. ९८२२८१०९६६ व ८५५८८५५६७५ असा आहे.