दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२३ | फलटण |
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र मलटण, ता. फलटण येथे बुधवार, दि. १२ एप्रिल २०२३ पासून श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम, जप, स्वामीचरित्र वाचन, प्रहर सेवा सुरू होणार आहे.
बुधवार, दि. १२ एप्रिल २०२३ ते मंगळवार, दि. १८ एप्रिल २०२३ या सप्ताह काळात पुढीप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत.
बुधवार, दि. १२ एप्रिलला सकाळी १०. ०० वाजता गुरूचरित्र पारायण सुरू होईल. दुपारी ४.०० वाजता हवनयुक्त वेगवेगळे पाठ होतील. वैशाख महिन्यातील होणार्या स्वामी सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वांनी जास्तीत जास्त या सेवेत सहभागी व्हावे.
सकाळी ठीक ७.०० वाजल्यापासून मंदिरात अखंड नामजप, स्वामी चरित्र वाचन आणि वीणा वादन सुरू होणार. सकाळी १०.०० ते १२.०० या काळात गुरूचरित्र पारायण होईल. संध्याकाळी ४.०० वाजता रोज पुढीलप्रमाणे हवनयुक्त पाठ होतील.
बुधवार, दि. १२ एप्रिल रोजी स्वामी चरित्र पारायण, गुरुवार, दि. १३ एप्रिल रोजी स्वामी चरित्र पारायण, शुक्रवार, दि. १४ एप्रिल रोजी श्री दुर्गासप्तशती पाठ, शनिवार, दि. १५ एप्रिल रोजी श्री नवनाथ भक्तीसार, रविवार, दि. १६ एप्रिल रोजी श्री मल्हारी सप्तशती पाठ, सोमवार, दि. १७ एप्रिल रोजी श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम्, मंगळवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० च्या आरतीनंतर हवनयुक्त स्वामी चरित्र सारामृत पारायण. त्यानंतर दुपारी सुंदर असा किर्तनाचा कार्यक्रम होईल आणि रोज प्रदक्षिणा घेतली जाईल. दुपारी ४.०० ते ६.०० आबा महाराज मोहिते (मुळीकवाडी) यांचे स्वामी समर्थ महाराज चरित्र विषयी कीर्तन व सायंकाळी ७.०० ते ९.०० महाप्रसादाचे वाटप होईल.
सर्व भाविकांनी या स्वामी सेवेचा लाभ घेऊन पुण्य प्राप्त करावे, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र मलटण यांनी केले आहे.