
दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। फलटण । राजाळे येथील श्री जानाई हायस्कूल व जुनियर कॉलेजचा दहावीचा निकाल 98.63 टक्के लागला. या परीक्षेसाठी एकूण 146 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी विद्यार्थी 144 उत्तीर्ण झाले. 01 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला. 01 विद्यार्थी अनुपस्थित होता.
या परीक्षेत सार्थक धनसिंग जाधव याने 95.00% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. नेहा धनाजी सूर्यवंशी हिने 94.00% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. धनश्री दिनेश निंबाळकर हिने 91.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता काकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. सचिन भैय्यासाहेब सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र भैय्या सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच प्रशालेच्या प्राचार्या सौ. गायकवाड, पर्यवेक्षिका श्रीमती काकडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.