दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२२ । पुणे । माळी समाज प्रबोधिनी महाराष्ट्र सांगोला अर्बन बॅक व सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र यांच्या सयुक्त विद्यामाने श्रीसंत सावता महाराज समाजभूषण पुरस्कर सोहळा 31 जुलै 2022 रोजी पुणे येथील समताभूमी वर संपन्न होत आहे त्यांस समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे तेव्हा सत्यशोधक रघुनाथ जी ढोक यांचा परिचय।
मा. रघुनाथ ढोक यांचे शिक्षण बीकॉम,एम. ए. मराठी असून पत्रकार कोर्स केला आहे.ते मुळचे वावरहिरे माण सातारा असून त्यांनी स्वतः पार्ट टाईम काम करून इ.8 वी ते पदवी पर्यंत शिक्षण पुणे येथे पूर्ण केलेत त्याकाळात ,NCC,कुस्ती,मल्लखांब मध्ये त्यांचा सहभाग मोठा होता माळी समाज संघटन,ओबीसी संघटन व सत्यशोधक विवाह आदि विष्यात कार्यरत आहे .अपंग गर्जुना इतरांचे माध्यमातून व्हीलचेअर,3 चाकी सायकली, जयपूर पाय,साड्या वाटप असे विविध कार्यक्रम सारखे करीत असतात. नियमित मुलासह दरवेळेस 3 जानेवारी,15 आगस्ट ला व पूर्वी अनेकवेळा रक्तदान केले असून सध्याही करीत असतात. सध्या गरज आसलेल्या सत्यशोधक विवाह क्षेत्रात राज्यातं व राज्यबाहेर तेलंगना ठिकाणी कार्ये जोरात करत आहे या उत्तम कार्याबद्दल त्याना विशेष पुरस्कराने सन्मानित केलेले आहे. वधुवर प्रामुख्याने घटस्पोट,विधवा,व इतर विषयावर मोफत कार्ये करत आहेत. विशेष म्हणजे सत्यशोधक पध्दतीने विवाह उच्चशिक्षित व लंडन मधील स्थायिक एलएलएम झालेला ब्राह्मण मुलगा याचा पुण्यात अनेक मान्यवरांनचे साक्षीने विवाह सत्यशोधक पध्दतीने लावला आहे.त्यांनी पुणे येथे निवासस्थानी फुले दाम्पत्य पुतळा व वावरहिरे येथे निवासस्थानी फुले,शाहु,आंबेडकर, सावित्रीबाई यांच्या पुतळ्यासह सर्व आधुनिक सोयी सुविधा सह मोफत सत्यशोधक विवाह लावण्यासाठी सोया केली असून आजपर्यंत गेली 3 वर्षात त्यांनी 36 रजिस्टर नोंदणी करून मोफत सत्यशोधक विवाह लावलेले आहेत.ते नोकरी करीत अनेक संस्थेवर पदाधिकारी म्हणूनदेखील उत्तम कार्य करीत आहेत. अशा या उत्तम कार्याबद्दल माळी समाजाच्या वतीने श्रीसंत सावता महाराज समाजसेवा पुरस्कारसाठी त्यांची शिफारस साहेबराव जाभूलकर यांनी केली त्यावरून समिती प्रमुख चित्रपट निर्मिति संगिता शिंदे यांनी त्यांची निवड़ करीत असल्याचे म्हटले आहे यानिवडिबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कुळधरण यांनी अभिनंदन करुंन शुभेच्छा दिल्यात आणि पुणे येथे होत असलेल्या कार्यक्रमास कुटुबा सह उपस्थित राहण्याचे निमत्रण दिलेले आहे.