क्रीडामंत्री सुनील केदार यांची राष्ट्रीय रोईंग स्पर्धेला भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । पुणे । क्रीडामंत्री सुनील केदार यांनी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आर्मी रोईंग नोड येथे सुरू असलेल्या ३९ व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय रोईंग चॅम्पियनशीप स्पर्धा तसेच २३ व्या स्प्रिंट रोईंग स्पर्धेस भेट दिली.

यावेळी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सीएमई रोईंग नोडचे कमांडींग ऑफिसर कर्नल संदीप चहल, रोईंग फेडरेशन ऑफ इंडियाचे तहहयात अध्यक्ष कर्नल (निवृत्त) सी. पी. सिंग देव, वरिष्ठ उपाध्यक्ष राजपाल सिंग, रोईंग क्रीडाप्रकारच्या आंतरराष्ट्रीय पंच स्मिता शिरोळे- यादव आदी उपस्थित होते.

कर्नल चहल यांनी रोईंग नोडच्या स्थापनेबाबतची, आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. ही देशातील रोईंग अभ्यासक्रमाची एकमेव मानवनिर्मित सुविधा आहे. कंपन्यांच्या रसायनमिश्रित पाण्याचे शुद्धीकरण करून ते या रोईंगच्या तलावात सोडले जाते, असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत देशभरातील २६ संघटनांचे संघ सहभागी झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!