क्रीडा स्पर्धेचा व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव – मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ फेब्रुवारी २०२३ । सातारा । जिल्हा परिषदे अंतर्गत तब्बल 10 वर्षांनंतर वार्षिक क्रीडा व व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धेत  व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन ताण-तणाव विसरुन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आनंद घ्यावा व आपल्या कला गुणांना वाव द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले.

येथील पोलीस कवायत मैदानावर जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा  व सांस्कृतिक महोत्सवाचे 10 ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गझी नृत्य व लेझीम ढोल-ताशांच्या गजरात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्साह पाहून आनंद होत असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी  म्हणाले, प्रत्येक पंचायत समितींचे संघ या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कला गुणांना वाव मिळणार आहे. खेळाडूंनी खिलाडीवृत्तीने सर्व नियम पाळून खेळाचे प्रदर्शन करावे. प्रत्येक वर्षी वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. या पुढील काळातही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातारा जिल्हा परिषदेचा आणखीन नावलौकीक कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही श्री. खिलारी यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!