दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । पुणे । ‘विकासपर्व काय असते ते पहायला मिळाले. अतिशय सुंदर, सुरेख, सर्वसामान्य जनतेला समजेल असे मुद्दे पहावयास मिळाले !‘, ‘प्रत्येक घटकासाठी शासन म्हणून केलेले काम अभिमानास्पद आहे.‘, ‘अप्रतिम, खूपच सुंदर एक नवीन अनुभव!‘ अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्या विभागीय माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची‘ या सचित्र प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांकडून.
जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती व जनसंपर्क विभागाअंतर्गत विभागीय माहिती कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजना व विकासाकामांवर आधारित चित्रमय प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. प्रदर्शनाला सर्वच घटकातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. लोकप्रतिनिधी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, निवृत्त शासकीय अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, लहान बालके आदी सर्वांनीच प्रदर्शनाला भेट देऊन शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. आबालवृद्धांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली आहे. हे प्रदर्शन ५ मेपर्यंत सुरू राहणार आहे.
या सरकारने केलेले काम पाहून मला फार आनंद होतो. सरकारने सर्व नागरिकांना या दोन वर्षात खूप कामे करून दाखवली आहेत. मला या सरकारचा खूप अभिमान आहे. सरकारला खूप शुभेच्छा! अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महादेव व्यवहारे यांनी. तर हवेली तालुक्यातील कोलवडी येथील बाळासाहेब आळंदकर म्हणतात, शासनाने दोन वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. संपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रदर्शनातून उत्कृष्टपणे झाल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले