10 दिवसांच्या लॉकडाउनला कराड, मलकापूर शहरासह कराड तालुक्यातील सर्व गावांत उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. १८ : सातारा जिल्ह्यातील  करोना  चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाउनला कराड, मलकापूर शहरासह कराड तालुक्यातील सर्व गावांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेडिकल, हॉस्पिटल आणि दूध विक्री या अत्यावश्यक सेवा सोडल्या तर शहरांसह गावागावातील सर्व रस्ते ओस पडले असल्याने पहिल्याच दिवशीच कडकडीत लॉकडॉउन झाला. दरम्यान, विनाकारण घराबाहेर पडणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधिक्षक सूरज गुरव यांनी सांगितले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्या-साठी जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउननुसार शुक्रवारी सकाळपासूनच कराड, मलकापूर शहरांसह तालुक्यातील सर्व उद्योगधंदे आणि बाजारपेठा बंद केल्या आहेत. यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.  ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे.

कराड, मलकापूर शहरासह विद्यानगर, ओगलेवाडी, मसूर, रेठरे, काले, ओंड, उंडाळे, विंग, उंब्रज विभागातील गावांमध्येही लॉकडॉउनला प्रतिसाद देत सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली तर नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. त्यामुळे शहरासह गावागावातील रस्त्यांवरही शुकशुकाट दिसत होता. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, कराड तालुका पोलीस निरीक्षक धुमाळ, कराड शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांसह तालुक्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!