दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
मारुती मंदिर, आळजापूर या ठिकाणी ग्रामपंचायत आळजापूर यांच्या वतीने बांधकाम कामगार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचा शुभारंभ श्री. शरद झेंडे (बांधकाम कामगार समिती संघटना) यांनी करून या शिबिरास बहुमोल असे मार्गदर्शन केले. येणार्या काळात आळजापूर गावातील बांधकाम कामगार यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ त्यांच्या माध्यमातून मिळवून देऊ, असे आश्वासन झेंडे यांनी यावेळी दिले.
गावातील ग्रामस्थ, महिला व युवक यांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घेतला. शासनाच्या वतीने या योजनेसाठी आरोग्य, शिष्यवृत्ती, संसारोपयोगी साहित्य तसेच इतर ज्या काही सुविधा दिल्या जातील त्याची माहिती या शिबिरामध्ये देण्यात आली. यावेळी जे ग्रामस्थ उपस्थित होते त्यांचे फॉर्म जागेवर भरून घेण्यात आले.
शिबिरास सरपंच श्री. शुभम नलवडे, श्री. नितीन नलवडे (मा.उपसरपंच), श्री. जयवंत केंजळे (मा. उपसरपंच), श्री. विजय काकडे (बांधकाम कामगार संघटना), ग्रा. पं. सदस्य श्री. सुनील पवार, श्री. मनोज नलवडे, आरोग्य सेविका शुभांगी फडतरे उपस्थित होत्या. तसेच या कॅम्पसाठी सुनील नलवडे, सागर काकडे, भरत नलवडे, अमोल शिंदे, बंटी भगत, संदीप शामराव नलवडे, शत्रुघ्न नलवडे, दीपक गुरव, सूरज मसुगडे, रवींद्र जगताप, अनिल काकडे, सागर खुडे, विकास काकडे, रविंद्र जगताप, मोहन मसुगडे, बाबू शिंदे यांनी परिश्रम घेतले.