महिला व मुलींसाठी स्वसंरक्षणार्थ पथदर्शी कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.११ फेब्रुवारी २०२१ । सातारा । सातारा जिल्हा पोलीस दल व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने  फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित महिला व मुलींसाठी स्वसंरक्षणार्थ पथदर्शी कार्यशाळेस  उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
 महिलांच्या व मुलींच्या सुरक्षितेसाठी पोलीस प्रशासन निर्भया पथक, दामिनी पथक, पोलीस दादा  पोलीस दीदी या योजना राबविण्यात आले आहेत. निर्भया पथक महिलांच्या व मुलींच्या सुरक्षितेसाठी चांगल्या प्रकारे काम करीत आहे परंतु त्यातूनही एखादी मुलगी रस्त्यावरून एकटी जात असेल आणि तिच्यावर एखादा प्रसंग येत असेल तर तिने प्रसंग सावधान राखून स्वतःचे स्वसंरक्षण कशा पद्धतीने केले पाहिजे यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली  महिला सुरक्षा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत आहे फलटण मधील ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम  स्कूल फलटण,शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल SSC,. शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल CBSC, प्रोग्रेसिव  इंग्लिश स्कुल फलटण या शाळांमध्ये सध्या हे प्रशिक्षण सुरू असून इतरही शाळेत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात  स्ट्रेचींग, राऊंड रनिंग ,पंच ट्रेनिंग कूलिंग डाऊन,  स्टोल सेफ्टी पिन, पेन  टेक्निक ,आदींचे प्रशिक्षण ट्रेनर प्रिया शेडगे मुलींना देत आहेत. 24 फेब्रुवारी अखेर हे प्रशिक्षण चालू राहणार असून या प्रशिक्षणासाठी निर्भया पथकाच्या प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभवी भोसले, पोलीस  कॉन्स्टेबल सुरज परिहार ,पंचायत समिती बाल विकास प्रकल्प अधिकारी एस.एल. इंगळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका पी.आर. मेत्रेस व प्रशिक्षक टीम कार्यरत आहे. या सर्व टीमचे स्वागत सर्व शाळांचे प्राचार्य तसेच ब्रिलीयंट अकॅडमी च्या प्रशासकीय संचालिका प्रियदर्शनी भोसले यांनी केले व या उपक्रमाचे कौतुकही केले.

Back to top button
Don`t copy text!