दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । फलटण । शनिनगर नागपंचमी उत्सव मंडळ व योद्धा ग्रुप, फलटण यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात “पारंपारीक नागपंचमी उत्सव” “फक्त महिलांकरीता जल्लोष” मध्ये शहरातील अबाल वृद्धा, महिला, युवतींनी धरलेलले फेर, झिम्मा, फुगडी, अशा परंपरागत खेळाने व आधुनिक संगीताच्या तालावर ठेका धरुन संपन्न झाला, नागपंचमी उत्सवाच्या प्रारंभी श्री नागदेवतेची विधिवत पूजा युवा नेत्या श्रीमंत सौ.मिथिलाराजे सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. पारंपारिक नागपंचमी उत्सवाला फलटण शहरातील अबाल वृद्धा, महिला, युवती व बाळगोपाळानीं उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेत्या श्रीमंत सौ.मिथिलाराजे सत्यजीतराजे नाईक निंबाळकर ह्या होत्या. तर माजी नगराध्यक्षा श्रीमती विद्या गायकवाड, मा.नगरसेविका सौ.दिपाली निंबाळकर, मा.नगरसेविका सौ.सुवर्णा खानविलकर, सौ.सुपर्णा अहिवळे, सौ.रेश्मा शेख, सौ.सीमा देशमुख, सौ.रोहिनी देशमुख, सौ.लतिका अनपट, सौ.राजश्री शिंदे, सौ.अस्मिता बोराटे, सौ.संध्या राऊत, सौ.भारती ननावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
संयोजकांच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये पहिले दहा क्रमांक काढण्यात आले, त्यामध्ये प्रथम क्रमांक व मानाच्या पैठणीचा बहुमान सौ.दिपाली भिसे यांनी मिळविला, या स्पर्धेमधील उर्वरित विजेत्या महिला स्पर्धक सौ.मंदा निंबाळकर, सौ.निलम घोलप, सौ.सुनिता राऊत, सौ.कोमल मोहिते, सौ.जिया धामट, सौ.ज्योती भागवत, सौ.तायरा शेख, सौ.अश्विनी पवार, सौ.सोनिया मोरे यांनी आकर्षक गृहोपयोगी बक्षिसे मिळवली.
कार्यक्रमाचे आयोजन मा.नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, सौ.मंदा बाळासाहेब जानकर, सौ.तबस्सुम पप्पुभाई शेख, सौ.पल्लवी गणेश धायगुडे, सौ.स्नेहा बिचुकले यांनी केले होते.
सदरील कार्यक्रमास खंबीर साथ देत उत्तम असे नियोजन युवा नेते अभिजीत जानकर, पप्पुभाई शेख, दिपक देशमुख, अभिजीत जगताप, रोहीत शिंदे, यश कदम, ओंकार गाढवे, शेखर रेळेकर, प्रणव चमचे, अवधूत कदम, मयूर मारुडा, अवि धायगुडे, अजय शिंदे, विनोद निंबाळकर (पिनू), पप्पू कोरे, अनिल शिंदे, दिपक शिंदे, निलेश शिंदे, अक्षय साळुंखे (विटू) यांनी केले होते.