राज्य शासन शिक्षण विभाग आयोजित ऑनलाइन बालविकास दिन कार्यक्रमास फलटण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २६: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांचा वाढदिवस दि. १४ नोव्हेंबर रोजी देशभर बालदिन म्हणून साजरा होतो, त्याचे औचित्त्य साधून राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने इयत्ता १ ली ते १२ मधील विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना संधी देऊन विकसीत करण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर ऑनलाइन आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये फलटण तालुक्यातील विद्यार्थी/विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, या स्पर्धांपैकी फलटण तालुकास्तरीय स्पर्धांचे निकाल जाहीर झाले आहेत.

इयत्ता १ ली २ री गट – भाषण, इयत्ता ३ री ते ५ वी गट – पत्रलेखन, इयत्ता ६ वी ते ८ वी गट – स्वलिखित कविता वाचन, इयत्ता ६ वी ते ८ वी गट – नाट्यछटा/एकपात्री, इयत्ता ९ वी १० वी गट – पोस्टर तयार करणे, इयत्ता ११ वी ,१२ वी चा गट – निबंध लेखन, ९ वी,१० वी गट – निबंध लेखन, इयत्ता ११ वी,१२ वी गट – व्हिडीओ तयार करणे, इयत्ता १ ली ते १२ वी – बालसाहित्य इ-संमेलन अशा नऊ प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या.

तालुकास्तरीय स्पर्धांसाठी इयत्ता १ ली व इयत्ता २ री एक, इयत्ता ३ री ते इयत्ता ५ वी दुसरा, इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी तिसरा आणि इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी चौथा गट स्थापन करण्यात आला आहे, या चार गटातील प्रथम क्रमांकासाठी ७५० रुपये, १००० रुपये, १२०० रुपये आणि १५०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५०० रुपये, ७५० रुपये, १००० रुपये आणि १००० रुपये, तृतीय क्रमांकासाठी २५० रुपये, ५०० रुपये, ७०० रुपये आणि ७५० रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

तालुकास्तरीय निकाल खालीलप्रमाणे – स्पर्धा प्रकार, अनुक्रमे पहिले तीन यशस्वी स्पर्धक, त्यांच्या शाळा पुढील प्रमाणे : भाषण – ईश्वरी विकास जगताप, प्रा. शाळा पवारवाडी विडणी, स्वराज महेश ननावरे, प्रा. शाळा निंबळक, संघर्ष निलेश जगताप , प्रा. शाळा पवारवाडी विडणी.

पत्रलेखन – यशदा अविनाश गायकवाड प्रा. शाळा सासवड, कल्याणी सचिन सावंत प्रा. शाळा निंबळक, प्रगती दादासाहेब बनकर प्रा. शाळा माळवाडी सांगवी.

स्वलिखित कविता वाचन – प्रांजली दादासाहेब शिंदे शेठ गणपतराव सुर्यवंशी विद्यालय, तांबवे, अनुष्का दिलीप औंदे, प्रा. शाळा ढमाळटेक पिंप्रद, समृद्धी दीपक शेडगे प्रा. शाळा हिंगणगाव.

नाट्यछटा / एकपात्री – अथर्व महेंद्र गायकवाड प्रा. केंद्र शाळा तरडगाव, श्रुतिका योगेश पाचंगणे प्रा. शाळा शेरेचीवाडी हिंगणगाव, शुभम कृष्णाथ गुरव प्रा. शाळा शेरेचीवाडी हिंगणगाव.

पोस्टर तयार करणे – गौरी संग्राम जेजुरकर मुधोजी हायस्कुल फलटण, आकांक्षा महादेव शिंदे शेठ गणपतराव सुर्यवंशी विद्यालय तांबवे, आर्यन संतोष अडसूळ मुधोजी हायस्कुल फलटण.

निबंध लेखन – साक्षी सोमनाथ माने मुधोजी हायस्कुल फलटण, विजया सुनील कदम मुधोजी हायस्कुल फलटण, स्नेहा दिलीपकुमार श्रीवास्तव मुधोजी हायस्कुल फलटण.

निबंध लेखन – प्रियंका आनंदा बोबडे मुधोजी हायस्कुल फलटण, आदित्य संजय भगत शरद प्रतिभा माध्यमिक विद्यालय, गौरी संग्राम जेजुरकर मुधोजी हस्यस्कुल फलटण.

व्हिडीओ तयार करणे – सौरभ गणपत कोरडे मुधोजी हायस्कुल फलटण.

बालसाहित्य इ-संमेलन – माधुरी महेंद्रकुमार ननावरे मुधोजी हस्यस्कुल फलटण, अनिकेत गोरख जाधव मुधोजी हायस्कुल फलटण, सौरभ गणपत कोरडे मुधोजी हायस्कुल फलटण.

बाल दिवस साप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले असून शाळा बंद पण शिक्षण सुरु हे अलिकडील कोविड काळातले शिक्षण विभागाचे ब्रीद विद्यार्थ्यांनी सिद्ध केल्याचे दिसून येत आहे.

घरी बसून स्पर्धेत ऑनलाईन सहभागी व्हावयाचे असल्याने विद्यार्थी/विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे नमूद करीत यशस्वी स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे, मात्र सहभागी प्रत्येक स्पर्धकाचे सहभाग प्रमाणपत्र संकेत स्थळावरुन काढता येईल असे फलटण पंचायत समिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!