दैनिक स्थैर्य । दि. १२ डिसेंबर २०२१ । सातारा । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शहिद जवानांना आदरांजली व कोरोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण होत असलेल्या रक्ताच्या तुटवड्यानिमित्ताने बोरगाव पोलीस ठाण्यामार्फत नुकतेच बोरगाव (ता.सातारा) येथील संस्कृती मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील गावांमधील जनतेतून उत्फुर्त प्रतिसाद भेटला.
बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ यांनी या शिबिराचे उद्घाटन केले.सातारा येथील अक्षय ब्लड बैंकच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली.या शिबिरात १०५ रक्तदात्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला.यामध्ये महिलावर्गानेही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर,हवालदार विजय देसाई,किरण निकम,अमोल गवळी,विजय साळुंखे,उत्तम गायकवाड,राहुल भोये, नागठाणे भाग पत्रकार संघाचे अध्यक्ष विकास जाधव,उपाध्यक्ष दत्ता घाडगे,सतीश जाधव,सुहास काजळे, सूर्यकांत पवार,धनाजी कणसे,सचिन पडवळ,शरद पवार,अमित जगताप तसेच पोलीस पाटील संघटनेने विशेष परिश्रम घेतले.