आध्यात्मिक यात्रा व श्रवण महापर्वणी यात्रेचे ७ मार्च २०२५ ला प्रस्थान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील साधकांसाठी आध्यात्मिक यात्रा व श्रवण महापर्वणी आयोजित केली आहे. श्री गुरुदेवांच्या आशिर्वादाने, सर्व सद्भक्तांच्या सहकार्याने व परमस्नेहाचे योगे दि. ०७/०३/२०२५ ते १९/०३/२०२५ या कालावधीत श्रीमद् भागवत महापुराण कथा श्रवण श्रीक्षेत्र शुकताल, कल्याणदेव आश्रम् (मूळ भागवत पीठ) येथे होणार असून हरिद्वार, ऋषिकेश या तीर्थक्षेत्र दर्शनाचा लाभही घेता येणार आहे.

या यात्रेची माहिती पुढीलप्रमाणे –

  • दि. ७/३/२०२५ रोजी गाडी नं. १२७७९ गोवा एक्सप्रेसने पहाटे पुणे ते दिल्ली प्रवास.
  • दि. ०८/०३/२०२५ रोजी पहाटे दिल्ली येथे आगमन सकाळी ६ वा. व पुढील प्रवास बसने शुकताल येथे करण्यात येईल.
  • दि. ९/३/२०२५ ते १५/०३/२०२५ श्रीक्षेत्र शुकताल येथे सकाळी ९ ते १२.३० व दुपारी ४ ते ७ दोन सत्रात श्रीमद् भागवत कथा सप्ताह व दि. १६/०३/२०२५ रोजी होम-हवन.
  • दि. १६/०३/२०२५ कथेची पूर्णाहुती होम हवन व अवभृत स्नान.
  • दि. १७/०३/२०२५ रोजी पहाटे हरिद्वार, ऋषिकेश कडे प्रस्थान व शुकताल येथे मुक्काम.
  • दि. १८/०३/२०२५ रोजी गाडी नं. १२७८० निजामुद्दीन – पुणे प्रयान.
  • दि. १९/०३/२०२५ रोजी सायंकाळी ५ वा. पुणे येथे आगमन.

या यात्रेचे शयनयान श्रेणी प्रवास, निवास, भोजन व इतर सर्व खर्चासह मिळून यात्रा मूल्य रु. २०,५०० /- (ट्रिपल शेअरिंग), २२,५००/- (डबल शेअरिंग) असेल. वातानुकूलित श्रेणीचा खर्च २५,५००/- अधिक भरावा लागेल. (हा प्रवास थ्री टायर एसीने आहे, टुू टायर एसी किंवा विमानाने यावयाचे असल्यास त्याचा वेगळा चार्ज द्यावा लागेल).

उपवास असणार्‍या भाविकांनी एक दिवस अगोदर आयोजकांना कल्पना द्यावी. नित्य सकाळी ६ वा. पहिला चहा (चहा, कॉफी), सकाळी ८.३० ते ९.०० अल्पोपहार व चहा (चहा, कॉफी), दुपारी १२ वा. भोजनात मिष्ठान्न प्रसाद असेल, दुपारी ४ वा. चहा, रात्री ९ वा. भोजन अशी व्यवस्था असेल.

जाताना व येताना प्रवासातील भोजन, पाण्याची बाटली, टॉर्च, कुलूप, किल्ली, स्वत:चे ओळखपत्र व स्वत:ची औषधे प्रत्येकाने जबाबदारीने आणावीत. तसेच मौल्यवान वस्तूंची काळजी ज्याची त्याने घ्यावी. वातानुकूलित खोली हवी असल्यास त्याचे अधिक शुल्क भरावे लागेल.

सप्ताह कालावधीत प्रत्येक भाविकाला ग्रंथपूजन व आरतीचा मान मिळेल. ही यात्रा पुणे ते पुणे राहील.

कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार आयोजकांना असेल. तरी ही संपूर्ण आध्यात्मिक यात्रा आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

बुकिंग करतेवेळी रु. १०,०००/- भरून आपली सीट नक्की करावी. अ‍ॅडव्हान्स कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.

संपर्क –
श्री. रुद्रभटे यांची गुरुयात्रा, फलटण
मो. ९४०३१६६७८८, ८३२९७०८७७९, ९३७०७५७७७६

साधकांबरोबर भागवताचार्य श्री. राघवेंद्र नरहरि देशपांडे असणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!