स्थैर्य, दि.२७: हे वर्ष देशातील गृहिणींसाठी खूप त्रासदायक ठरले आहे. खाद्यतेलापासून फळे-भाज्यांचे सर्व भाव जास्त राहिले. एवढेच नव्हे तर अखेरच्या महिन्यात स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीतही वाढ झाली. या सर्व महागड्या वस्तूंमध्ये केवळ मसाल्याच्याच अशा काही वस्तूंमुळे काहीसा दिलासा मिळाला. कोरोना काळात मसाल्याच्या ठोक मागणीत आलेल्या घसरणीमुळे प्रमुख मसले जिरे, धणे, हळद आणि वेलचीच्या किमतीत ८ ते ५६ टक्क्यांपर्यंत घट आली. आकडेवारीनुसार, वेलचीच्या वायदा बाजारात या वर्षी ५६ टक्क्यांची मोठी घसरण झाली. धण्याच्या भावात १६ टक्के आणि जिरेच्या किमती १५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत. हळदीतही या वर्षी ८.५ टक्के घसरण नोंदली आहे. मसाल्यांच्या या घसरणीमागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. व्यापर गतिशीलतेत आलेल्या बदलामुळे मसाल्यांना नुकसान पोहोचवले आहे. ठोक गुंतवणूकदार किंवा स्टॉकिस्टने महारोगराईमुळे खरेदी कमी केली. एंजेल ब्रोकिंगचे एव्हीपी कमोडिटी रिसर्च अनुज गुप्ता यांच्यानुसार, गेल्या वर्षी मान्सून चांगला साधल्यामुळे मसाल्यांचे चांगले उत्पादन झाले होते. मात्र, कोविडमुळे मागणी निघाली नाही. यादरम्यान निर्यातीतही घट आली. परिणामी किमती घटल्या. गुप्तांनी सांगितले की, जोवर निर्यातीचा वेग पकडत नाही तोवर किमती खाली राहतील. केडिया कमोडिटीचे अजय केडिया म्हणाले, धण्याच्या भावात सर्वात जास्त १५ टक्क्यांची घसरण केवळ एका महिन्याच्या आसपास आली.
वेलचीच्या किमती आवाक्यात येताहेत
जिऱ्याच्या भावात घसरण लॉकडाऊन आणि घाऊक खरेदीदारांच्या मागणीत आलेल्या कमतरतेमुळे आली आहे. वेलचीच्या भावांत ६० %घसरण होण्यामागे लॉकडाऊन आणि घाऊक खरेदीच्या मागणीत घट आल्यामुळे झाली आहे. केवळच्या पुरामुळे वेलचीचे नुकसान झाले. ऑगस्ट २०१९ मध्ये वेलचीचे भाव ४४६५ रु. प्रति किलोपर्यंत तर २०१८ मध्ये हा भाव १४७० रु. प्रति किलो होता. वेलचीचा वायदा भाव १५०० रुपये प्रति किलो आहे. हा विश्लेषकांनुसार आवाक्यात परतत आहे.