भरधाव ट्रकची टँकरला धडक

ट्रक चालकाचा जागीच मृत्यू


दैनिक स्थैर्य । 7 मार्च 2025। सातारा । सातारहून पुण्याला निघालेला दूधाचा टँकर दुपारी रस्त्याच्याकडेला बंद पडला. याच टँकरला भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने पाठीमागून धडक दिली. या धडकेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. किरण आकाराम सिसोळे (वय 28, रा. वाळवा, सांगली) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दूधाचा टँकर सातारहून पुण्याकडे निघाला होता. यावेळी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डी मार्टच्या हद्दीत तो रस्त्याच्या कड़ेला बंद पडला. अवघ्या काही वेळात किरण सिसोळे हा भरधाव वेगाने ट्रक चालवत आला. त्याने या टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत किरण गंभीर जखमी झाला. परिसरातील काही रहिवाशांनी, वाहनधारकांनी या अपघाताची माहिती सातारा तालुका पोलीसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत किरण याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वी तो मयत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. अपघात होताच दूधाच्या टँकर चालकाने घटनास्थळाहून पळ काढला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!