
स्थैर्य, सातारा, दि. 8 डिसेंबर : पुणे -बेंगलोर महामार्गावर सातारा- पुणे प्रवासादरम्यान एका ट्रकनं सहा चारचाकी गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे. खंबाटकी घाटातील पुण्याच्या दिशेने जाणार्या मार्गिकेवर ही घटना घडली. खंबाटकी घाटातल्या बोगद्यानंतर येणार्या एस आकाराच्या वळणावर भरधाव ट्रकनं सात वाहनांना धडक दिली. यात वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. सुदैवानं यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तसंच कुणाला गंभीर दुखापत झालेली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खंबाटकी घाटातून पुण्याच्या दिशेने येणार्या मार्गिकवर अज्ञात ट्रकनं अनेक वाहनांना धडक दिली. यात 6 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. सुदैवानं यात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वाहनांना धडक दिल्यानंतर अज्ञात ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास केला जात आहे. यात वाहन चालक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.

