भरधाव दुचाकीस्वाराने वृद्धाला दिली धडक; फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

शहरातील सराफ दुकानासमोर घडली घटना; निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई


स्थैर्य, फलटण, दि. २४ ऑगस्ट : रस्ता ओलांडणाऱ्या एका ८५ वर्षीय वृद्धाला भरधाव वेगातील दुचाकीने जोरदार धडक देऊन जखमी केल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर किसन तोडकर (वय ८५, रा. स्वामी विवेकानंदनगर, फलटण) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ४:३० च्या सुमारास ते सातारा-फलटण रस्त्यावरील धन्यकुमार सराफ ज्वेलर्स दुकानासमोरून पायी रस्ता ओलांडत होते.

त्यावेळी, आरोपी बाळू सुळ (रा. आदर्की, ता. फलटण) याने आपली मोटारसायकल (क्र. MH 11 BQ 1871) भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत आणून प्रभाकर तोडकर यांना धडक दिली. या अपघातात तोडकर यांना गंभीर व किरकोळ दुखापत झाली आहे.

या घटनेप्रकरणी आरोपी बाळू सुळ याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार तसेच मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार अमोल रणवरे पुढील तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!