दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२३ । बारामती । बारामती तालुक्यातील तीन खेळाडू क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे नवी मुंबई राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत दिनांक 8 व 9 जुलै रोजी सहभागी झाले होते. या स्पर्धेत अमृत मलगुंडे रजत पदक व आदित्य आटोळे आणि दिनेश तावरे दोघांनी कास्य पदकाची कमाई करून बारामतीचे नाव राज्यभर गाजवले पिंच्याक सिलाट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट चा प्रकार असून टाडिंग,तुंगल, गंडा, रेगो,व सोलो, इत्यादी पाच प्रकारात खेळला जातो. या खेळाला युवकल्याण क्रीडा मंत्रालय भारत सरकार, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया, इत्यादीची मान्यता असून हा खेळ केंद्रीय नोकर भरतीच्या पाच टक्के आरक्षणात आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत 21 जिल्ह्यातील 210 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेत गोल्ड आणि सिल्वर मिळवणाऱ्या खेळाडूंची विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे होणाऱ्या 11व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत निवड झाली असून या स्पर्धेत 28 राज्य व 07 केंद्रशासित प्रदेश तसेच ऑल इंडिया पोलीस संघाचे मिळून एकूण 1200 खेळाडू सहभाग नोंदवणार आहेत या राष्ट्रीय स्पर्धेतून 37 व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी प्रत्येकी वजन गटात 16 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले सर यांनी दिली गेल्या 12 वर्षापासून योद्धा स्पोर्ट्स क्लब राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती ऑल पुणे ग्रामीण पिंच्याक सिलाट असोसिएशन बारामती च्या माध्यमातून खेळाडू घडविण्याचे कार्य करत आहे अशी माहिती मास्टर साहेबराव ओहोळ सर यांनी दिली. ऑल पुणे ग्रामीण पिंच्याक सिलाट असोसिएशन बारामतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी खेळाडूंचे इंडियन पिंच्याक सिलाट चे अध्यक्ष श्री किशोर येवले सर यांच्या हस्ते मिडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.