दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । फलटण । फलटण येथील सद्गुरू प्रतिष्ठान संचालित ब्रिलियंट अॅकॅडमी इंग्लिश मिडियम स्कुल फलटण या प्रशालेत विदयार्थ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा नेत्रदिपक असा सोहळा साजरा केला.
सद्या आळंदी ते पंढरपुर पालखी वारी यात्रा सुरू असुन त्याच धर्तीवर प्रशालेत आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळयाचे आयोजन करण्यात आली होते.या मध्ये विदयार्थ्याचा उदंड प्रतिसाद होता. संत तुकाराम़ संत ज्ञानेश्वऱ संत निवृत्तीनाथ़ संत मुक्ताबार्इ़ शिवाजी महाराज अशा महान संतांच्या वेशभुषेसह टाळमृदृंग़ डफ हातात भगवे पताके घेऊन सहभागी झाले होते.
पालखी सोहळा सादरीकरनाच्या प्रारंभी आषाढी एकादशी पालखी सोहळा मार्ग याचे महत्त्व या विषयी माहिती विदयार्थ्यांना दिली. या वेळी विदयार्थ्यांनी अभंग म्हटले. या नंतर पालखीचे पुजन प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. प्रफुल्ल अडागळे यांच्या हस्ते झाले. या नंतर ज्ञानेश्वर महाराजांची आरती घेण्यात आली या वेळी सर्व शिक्षकवृंद,
विद्यार्थी उपस्थीत होते.
पालखी पुजनानंतर शाळेच्या प्रागंणात विदयार्थ्यांनी गोल रिंगन साजरे केले. ’माऊमी माऊली’ च्या गजरात हे नेत्रदिपक असे रिंगन झाले. यास विदयार्थ्यांचा प्रतीसाद उदंड होता. माऊलीच्या जय घोषात सर्व परिसर दुमदुमुन गेला. या नंतर पालखीचे प्रस्थान करण्यात आले. पालखी व्दारे विदयार्थ्यांनी विठुमाऊलीचा जयघोष सुरू केला त्याच प्रमाणे स्वच्छता व वृक्षारोपनाचा संदेश दिला पालखी मार्गक्रमन करीत असताना मुलींनी फुगडया खेळल्या़ मुलांनी टाळमृदुंगा व्दारे माऊली चा जय घोष केला. धार्मीक व उत्साहपुर्ण वातावरणात पालकी पुन्हा फिरून प्रशालेत विसावली़ पसायदानाने या सोहळयाची सांगता झाली.
मुलांना या पालखी सोहळयाव्दारे पालखीचे धार्मीेक महत्त्व़ संतांची माहिती़ रिंगन याची माहिती मिळाली या
पालखी सोहळयास प्रशालेचे सचिव रणजितसिंह भोसले, प्रशासकीय संचालक सौ. प्रियदर्शनी भोसले,पालकवर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.