
दैनिक स्थैर्य । 28 जुलै 2025 । सातारा । येथील कृष्णा नगर परिसरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचे आवारात असणाऱ्या श्री नागदेवता मंदिरात श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमी निमित्त मंगळवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत नागमूर्तीला विशेष महाभिषेक व महापूजा करण्यात येणार आहे तसेच उपस्थित भक्तांच्या हस्ते नागमूर्तीला शहाळ्याचे अर्थात हिरव्या नारळाचे पाणी आणि दुधाचा अभिषेक घालण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता आरती संपन्न होऊन त्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे नागमूर्तिच्या पूजेसाठी व महाभिषेकासाठी सातारा शहर परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व पूजेचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर यांचे वतीने सर्व विश्वस्त आणि संयोजन समितीने केले आहे.