दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२२ । सातारा । राज्यातील महाविकास आघाडी शासनास दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राज्यभर एकाच कालावधीत लोककलांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या योजना लोककला पथकांच्या कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे मनोरंजन करत गावोगावी पोहचवल्या . जिल्हाभरात या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.
त्रिरत्न सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था कलापथकांच्यावतीने कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव, देऊर, रहिमतपूर, वाठार स्टेशन, पिंपोडे बु, तारगाव, पाटण तालुक्यातील पाटण, ढेबेवाडी, मोरगिरी, मल्हार पेठ, कोयनानगर, मरळी , सातारा तालुक्यातील सातारा, नागठाणे, वडूथ व कराड तालुक्यातील कराड, वाठार, उंब्रज, रेठरे बु., मसुर, उंडाळे. आधार सामाजिक विकास संस्था यांच्यावतीने फलटण तालुक्यातील फलटण, तरडगाव, दुधेबावी, आसू, जिंती, साखरवाडी, माण तालुक्यातील दहिवडी, मार्डी, गोंदवले, मलवडी, म्हसवड, शिखर शिंगणापूर, खटाव तालुक्यातील खटाव, वडूज, पुसेगाव, औंध, मायणी. खंडाळा तालुक्यातील खंडाळा, लोणंद, शिरवळ, वाठार. तर लोकरंगमंच, सातारा यांच्यावतीने महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर, पाचगणी, भिलार, वाई तालुक्यातील वाई, पाचवड, भुईंज सुरुर, बावधन, ओझर्डे, बोपेगाव, खंडाळा तालुक्यातील भादे, नायगाव, बावडा व जावली तालुक्यातील मेढा, केळघर, कुडाळ, आनेवाडी, रिटकवली, हुमगाव, मोहाट व सायगाव या गावांमध्ये कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षात शासनाने लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, त्यांना योजना सोप्या व सहज भाषेत समजावे म्हणून लोककलेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शासनाच्या योजनांची लोककलेच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.
कलापथकांद्वारे महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प, महाआवास अभियान, ई-पीक पहाणी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना, शिवभोजन थाळी योजना, शेतकऱ्यांसाठी विमा योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, मीनाताई ठाकरे जल सिंचन योजना, ऊसतोड कामगारांसाठी विमा योजना, रमाई आवास योजना, कामगारांसाठी ई-श्रमिक कार्ड योजना, मुला मुलींसाठी मोफत शिक्षण यासह विविध योजनांची लोककलेच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.