
दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । सातारा । शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा 26 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून सोमवारी देवीच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा करुन घटस्थापना करण्यात आली. तब्बल दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे राज्यभरात नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला नव्हता. यंदा मात्र कोरोनाचं सावट नसल्याने पुन्हा पूर्वीच्याच जल्लोषात आणि आनंदात नवरात्रौत्सव साजरा करता येत आहे. याच निमित्ताने ईश्वरी चित्रपटातून मराठी चित्रपटविश्वात पुन्हा पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री प्रीती मल्लापूरकरने दूर्गा अवतारात केलेलं खास फोटोशूट प्रचंड व्हायरल होत आहे.
नवरात्रीच्या निमित्तानं आपण अनेक अभिनेत्रींना देवीच्या वेगवेगळ्या वेशात फोटोशूट केलेलं पाहिलं आहे. यातच आता अभिनेत्री प्रीती मल्लापूरकरचं नाव देखील सामिल झालं आहे. हातात त्रिशूळ, लाल साडी आणि तोंडावर चंडीकेप्रमाणे दिसत असलेला रौद्रावतार असलेले हे फोटो पाहाताना तुम्हाला साक्षात देवीचं रूप पाहिल्याचा साक्षात्कार होईल.
अभिनेत्री प्रीती मल्लापूरकर आवाहानात्मक भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिने ईश्वरी चित्रपटात केलेली मुकबधीर मुलीची भूमिका विशेष ठरली. आगामी काळात राष्ट्रीय पूरस्कार विजेचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या ‘आतूर’ या सिनेमातून प्रीती आपल्या अभिनयाची जादू पसरवताना दिसरणार आहे. या सिनेमात प्रीतीसह अभिनेता चिन्मय उदगीरकर, योगश सोमण, प्रणव रावराणे आणि अभिनेत्री रश्मिता शहापूरकर, मुक्ता पटवर्धन यांची भूमिका पाहायला मिळणार आहे. लवकरच ह्या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.