सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कोळकी येथे विशेष सभा; नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासंदर्भात मार्गदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२३ | फलटण |
शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंध विभाग, सातारा यांच्याकडून कोळकी (ता. फलटण) येथे ग्रामपंचायतीत विशेष सभा घेण्यात आली. या सभेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सौ. उज्ज्वला वैद्य यांनी नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी सौ. उज्ज्वला वैद्य यांनी सरकारी नोकर किंवा लोकप्रतिनिधी यांनी कोणतेही शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास न घाबरता सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२१६२-२३८१३९, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक – ७८७५३३३३३३, वेबसाईट acbmaharashtra.gov.in, E-mail : dyspacbsatara@mahapolice. gov.in, [email protected], Mobile App : www.acbmaharashtra.net, Facebook Page : www.facebook.com/MaharashtraACB किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा, जिल्हा कोषागार कार्यालयाशेजारी, ५२४ अ, सदरबझार, सातारा येथे संपर्क साधावा.

कोळकी ग्रामपंचायतीत आयोजित केलेल्या या विशेष सभेस ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!