कोकण फिल्म फेस्टिवलमध्ये ‘कुलूपबंद’ लघुपटाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 22 : शीतल राजे फाऊंडेशन व कोकण फिल्म इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या ‘के.एफ.टी.आय’ इंडिया शॉर्टफिल्म ऑनलाइन फिल्म फेस्टिवलमध्ये येथील आशिष निनगुरकर दिग्दर्शित ‘कुलूपबंद’ या लघुपटाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे.

 

कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन मध्ये घरी राहून कोरोनाविषयी जनजागृती करणाऱ्या फिल्ममेकर्ससाठी ऑनलाइन फिल्म फेस्टिवल चिपळूणच्या कोंकण फिल्म इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.सदर फेस्टिवलमध्ये एकूण सत्तर फिल्ममधून नगरच्या काव्या ड्रीम मुव्हीज व किरण निनगुरकर निर्मित ‘कुलूपबंद’ या लघुपटाने परिक्षकांची पसंती मिळवत ‘स्पेशल ज्युरी अवार्ड’ प्राप्त केला आहे.’सुरक्षित अंतर पाळा, कोरोना संसर्ग टाळा’ असा ‘क्वारंनटाईन’चा सामाजिक संदेश देणाऱ्या या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन,कॅमेरावर्क व निर्मिती व्यवस्थापन अशी चौफेर धुरा आशिष निनगुरकर यांनी सांभाळली आहे.या लघुपटात स्वरूप कासार व अनुराग निनगुरकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.कोरोनाच्या या काळात घरच्याघरी राहून निर्मिती केलेल्या व ‘कोरोना’ बाबत जनजागृती केलेल्या ‘कुलुपबंद’ या लघुपटाने पुरस्कार मिळवल्याबद्दल टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!