दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून त्रृटीपुर्ततेसाठी दि. 20 ते 22 सप्टेंबर 2022 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या श्रीमती स्वाती इथापे यांनी दिली.
वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जातवैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सातारा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांच्याकडे अर्ज केला आहे व अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांचे प्रकरण त्रुटीयुक्त आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा या कार्यालयात दि. 20 ते 22 सप्टेंबर 2022 दरम्यान सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहुन त्रृटींची पुर्तता करावी. याबाबत समितीकडून त्रृटीपुर्तता विशेष मोहिम दि. 20 ते 22 सप्टेंबर 2022 दरम्यान राबविण्यात येणार आहे, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या श्रीमती स्वाती इथापे यांनी केले आहे.